नागपूर शहर: पाचपावली पोलिसांची कारवाई: दुचाकी चोर जेरबंद; तीन वाहने जप्त: विवेक पडघान पोलीस निरीक्षक
पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पडघान यांनी 18 ऑगस्टला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून १ लाख ४५ हजार रुपयांच्या तीन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसीम रजा दानिश अहमद रजा यांनी त्यांच्या घरासमोरील दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला.