कामठी: कामठीत भीषण आग: स्क्रॅप गोदामातील ५०० हून अधिक कार जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान
कामठी तहसील अंतर्गत येणाऱ्या खैरी परिसरात एका चारचाकी वाहन स्क्रॅप गोदामाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीने पाहता पाहता इतके रौद्र रूप धारण केले की, संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली. या भीषण आगीत गोदामात उभ्या असलेल्या ५०० हून अधिक जुन्या (स्क्रॅप) कार जळून पूर्णपणे खाक झाल्या आहेत.प्राथमिक अंदाजानुसार, या अग्निकांडात व्यापाऱ्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.