आज दि. 7 जून 2026 रोजी मा. पोलीस आयुक्त सोलापूर शहर, पोलीस उपायुक्त गुन्हे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनानुसार अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे आयोजित 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी च्या एकूण 480+ छात्र सैनिकांना सायबर क्राईम अवेअरनेस बाबतसायबर तज्ञ श्री अविनाश पाटील,पोलीस कॉन्स्टेबल श्री नीरज जगताप यांनी छात्र सैनिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर श्रीमान. कर्नल. एम डी उत्तप्पा व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर लेफ्टनंट कर्नल देवानंदे, कॅप्टन संतोष कांबळे सांगोला महाविद्यालय, रत्नदीप भोपळे अक्षर जुनियर कॉलेज कंदलगाव, श्रीमती उज्वला कुंभार मॅडम सांगोला विद्यामंदिर, श्रीमती मोहिनी गजरे मॅडम, कुर्डूवाडी,38 महाराष्ट्र बटालियनचे अधिकारी रोहित कुमार , उपस्थित होते.
19 views | Solapur, Maharashtra | Jun 8, 2026