उमरेड: उमरेड पोलिसांची कारवाई: लाखोचा प्रतिबंधित तंबाखूसाठा जप्त
Umred, Nagpur | Jun 17, 2026 उमरेड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे डोबरा गावातील शेताजवळ छापा टाकला. छापा मार कार्यवाही दरम्यान ४१०.८ किलो प्रतिबंधित सुगंधी तंबाखू किंमत २,४३,०५० रुपये आणि महिंद्रा टीयूव्ही वाहन असा एकूण **११,४३,०५० रुपयांचा** मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी श्रीकांत रमेश झाडे याला अटक करण्यात आली आहे.