🏆 ३४ व्या वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धा – २०२६ चा समारोप सोहळा!
नागपूर शहर पोलीस दलाच्या वतीने आयोजित ३४ व्या वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा, शिवाजी स्टेडियम, पोलीस मुख्यालय, काटोल रोड, नागपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या समारोप सोहळ्यास पोलीस आयुक्त मा. श्री. विश्वास नांगरे पाटील, मा. श्रीमती विनिता शाहू आणि मा. श्री. राजेंद्र दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या स्पर्धेत पोलीस अधिकारी व अंमलदारांनी विविध क्रीडा प्रकारांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले क्रीडाकौशल्य, शिस्त, जिद्द आणि सांघिक भावना यांचे उत्कृष्ट दर्शन घडविले.
पोलीस दलातील शारीरिक तंदुरुस्ती, खिलाडूवृत्ती आणि संघभावनेला प्रोत्साहन देणारा हा क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
🚔 नागपूर शहर पोलीस
विश्वास • सुरक्षा • सेवा
#NagpurCityPolice #PoliceSportsMeet2026 #AnnualPoliceSportsMeet #NagpurPolice #Sportsmanship