महाड: शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन
Mahad, Raigad | May 21, 2026 शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार 6 जून व तिथीनुसार 26 जून 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाची जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रमुख विभागांची दुरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित सर्व शासकीय यंत्रणेला दिल्या.