उरण: चाणजेच्या जंगलात गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त
Uran, Raigad | Jun 2, 2026 पिंपरी-चिंचवड येथे बनावट आणि विषारी दारूमुळे 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या भीषण दारूकांडानंतर अखेर नवी मुंबई पोलिसांना जाग आली असून, अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांवर कडक कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-2 ने उरण तालुक्यातील चाणजे गावाजवळील जंगल आणि शेत परिसरामध्ये धडक कारवाई करत गावठी हातभट्टीचे दोन मोठे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी हजारो लिटर्स कच्चे रसायन जागीच नष्ट केले असून एका 62 वर्षीय वृद्धाला ताब्यात घेतले आहे.