मुरुड: महामार्गावरील वरसगांव-भिराफाटा बनतोय धोकादायक
Murud, Raigad | Apr 9, 2026 मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील वरसगांव-भिरा फाट्यावर उड्डाण पुल न बनविल्यामुळे या महामार्गावर अपघाताची मालिका सुरु आहे. याला जबाबदार मुंबई-गोवा हायवेचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार हे असल्याचे बोलले जात आहेत. मुंबई गोवा हायवेवरील अनेक छोट्या गावासाठी उड्डाण पुल बनविण्यात आला आहे. पण मुरुड-भिरा मार्गावरून पुणे बाजूकडे जाणाऱ्या राज्यमार्गावरील भिरा फाट्यावर उड्डाण पुल असावा असे महामार्ग अधिकारी व संबंधित ठेकेदार यांना जाणीव का झाली नाही.