उरण: जेएनपीएच्या सीएफएस प्रलंबित कंटेनर्सच्या संख्येत मोठी घट
Uran, Raigad | May 27, 2026 जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) बंदरातील कंटेनर वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर विविध उपाययोजना राबवल्या आहेत. यामुळे गेल्या 15 दिवसांहून अधिक काळ बंदरात अडकून पडलेल्या आणि सीएफएसकडे जाणाऱ्या कंटेनर्सची संख्या सुमारे 2500 वरून थेट 450 वर आली आहे. पुढील आठवडाभरात ही संख्या नगण्य पातळीवर येण्याची अपेक्षा असून बंदराच्या लॉजिस्टिक व्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या तीव्र चालक टंचाईमुळे ही परिस्थिती उद्भवली होती, अशी माहिती जेएनपीए प्रशासनाने दिली आहे.