अंबरनाथ: गाजियाबाद येथील दासना देवी मंदिराचे महंत नरसिंहानंद यांच्यावर शील डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
गाजियाबाद येथील दासना देवी मंदिराचे महंत नरसिंहानंद यांनी मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास शिळफाटा येथील शील डायघर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा नोंद करण्यासाठी मौलाना जमाल यांनी शील डायघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या संदर्भात मौलाना जमाल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.