अंबरनाथ: खंडणीसाठी अपहरण केलेल्या वीस वर्षीय मुलाची ठाणे पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आत भिवंडी येथून केली सुखरूप सुटका
अंबरनाथ पूर्व परिसरामधील एका बांधकाम व्यावसायिकाच्या वीस वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची घटना 24 सप्टेंबर रोजी घडली होती. तक्रार अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर गांभीर्य लक्षात घेऊन 15 पोलीस अधिकाऱ्यांनी 80 अंमलदार यांची आठ वेगवेगळी पथके तयार करून व 45 सीसीटीव्ही फुटेज तपासून चाळीस लाखाच्या खंडणीसाठी आलेल्या फोन नंबरची तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या बारा तासाच्या आत भिवंडी परिसरातून सापळा रचून मुलाची सुखरूप सुटका करून दहा आरोपींना अटक केली आहे.