अंबरनाथ: बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपीबद्दल विरोधकांना कळवळा का? शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने काल पोलिसांवर गोळ्या झाडल्या त्यानंतर पोलिसांनी ही त्याच्यावर गोळ्या झाडल्या असून त्यात तो मारला गेला. मात्र या प्रकरणी आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत विरोधकांवर टीका केली आहे. अक्षय शिंदे बद्दल एवढा कळवळा का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.