अंबरनाथ: बदलापूरच्या एन्काऊंटरमधून कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय? काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यावरून आता काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका केली आहे. प्रचारही करता येईल आणि मुख्य आरोपींना वाचवता येईल यासाठी एन्काऊंटर केला का? असा प्रश्न त्यांनी केला असून शाळेचे विश्वस्त कोतवाल आणि आपटे यांचा एन्काऊंटर कधी करणार? असा प्रश्न जनता विचारत असल्याचाही ते म्हणाले.