अंबरनाथ: अक्षय शिंदे च्या आई-वडील, वकिलांना सुरक्षा देण्याची आणि अक्षय शिंदे दफन विधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
बदलापूर लगी कात्याचार प्रकरणातील एन्काऊंटर झालेला आरोपी अक्षय शिंदे च्या दफन विधीला बदलापूर येथे विरोध केला जात आहे. त्यामुळे जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच अक्षय शिंदे यांच्या आई- वडील आणि वकिलांना सुरक्षा द्यावी अशी मागणी बदलापूर पूर्व पोलिसात अक्षय शिंदे च्या नातेवाईकांनी व वडिलांनी अर्ज देऊन केली आहे. तसेच वकीलपत्र घेतलेल्या वकिलांवर टीका होत आहे त्यावर वकिलांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. वकिलांनी थेट सरकारवर आरोप केला आहे.