नागपूर शहर: सदर पोलिसांनी केली दोन सराईत चोरांना अटक : ज्ञानेश्वर भेदोडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी 14 ऑगस्टला दुपारी 5:30 ला दिलेल्या माहितीनुसार,सदर पोलिसांनी एका प्रकरणाचा पर्दाफाश करत इरफान शेख आणि सोहेल शेख या दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख २८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अंबाझरी परिसरातील मंदिर चोरीसह ३ दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आरोपी चोरीच्या पैशांचा वापर स्वतःच्या खर्चासाठी करत होते.