रामटेक: जि प शाळा नवरगाव येथील प्रसाधन गृहात आढळला विषारी घोणस साप; वेळीच पकडल्याने टळला मोठा अनर्थ
Ramtek, Nagpur | Mar 9, 2026 पंचायत समिती रामटेक अंतर्गत येणाऱ्या नवरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रसाधनगृहातून सोमवार दिनांक 9 मार्चला शाळेच्या काही मुलींना कुकरच्या शिट्टी वाजल्यासारखा आवाज आल्याने तिथे जाऊन पाहिले असता तिथे जहाल विषारी घोणस प्रजातीचा साप आढळला. सर्पमित्र सागर धावडे यांच्या मदतीने त्याच पकडून सुरक्षित जंगलात नेऊन सोडण्यात आले.हा विषारी साप वेळीच दिसून पकडण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.