शहादा: भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे शहादा- तळोदा मतदार संघाचे माजी आमदार पद्माकर वळवी यांचा भाजपात प्रवेश
भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे भाजपा प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा - शहादा मतदार संघाचे माजी तथा आमदार माजी मंत्री काँग्रस पक्षाचे नेते पद्माकर वळवी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी आदी उपस्थित होते '.