शहादा: खासदार राहुल गांधी यांच्या वाहनांचा ताफा गेल्यानंतर नंदुरबार येथील नेहरू पुतळाजवळ दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला दिली धडक
खासदार राहुल गांधी यांच्या वाहनांचा ताफा जाण्यासाठी नंदुरबार येथील नेहरू पुतळा येथे पोलिसांनी वाहनांना थांबवले होते. यावेळी एका दुचाकीने पुढे चालणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. ही घटना १२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान घडली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी सदरची वाहतूक सुरळीत केली.