शहादा: कलमाडी येथे उसाच्या ट्रॅक्टरवरून पडल्याने ट्रॉलीच्या टायरखाली दबून तरुणाचा मृत्यू, चालकाविरूद्ध शहादा पोलिसांत गुन्हा
शहादा तालुक्यातील कलमाडी येथे १० मार्च रोजी उसाच्या ट्रॅक्टरवरून पडल्याने ट्रॉलीच्या टायरखाली दबून तरुणाचा मृत्यू झाला आहे. शहादा तालुक्यातील ओझर्टा येथील महेंद्र गिरासे हा आपल्या ट्रॅक्टरने सुरेश वळवी यांना बसवून कलमाडी गाव शिवारातील कच्च्या रस्त्याने जात होता. याप्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरूद्ध शहादा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.