शहादा: राहट्यावड धरणाचे राहिलेले १० टक्के अपूर्ण काम पूर्ण करणार- आमदार राजेश पाडवी यांची माहिती
शहादा तालुक्यातील राहट्यावड धरणाचे राहिलेले १० टक्के अपूर्ण काम पूर्ण करणार असल्याची माहिती शहादा -तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली आहे. त्यांनी यावेळी सांगितले की याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी देखील या राहट्यावड धरणा संदर्भात निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरच या रहाट्यावड धरणाचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण होईल व शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील.