उमरेड: गोवंश तस्करीचा प्रयत्न ; दोन आरोपींना अटक, दोन बैलांची सुटका
Umred, Nagpur | Apr 28, 2026 बेला पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, चिमणाझरी गावाजवळ गोवंशाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहाथ पकडले. हे आरोपी दोन बैलांना क्रूरपणे बांधून कत्तलीसाठी नेत होते. पोलिसांनी दोन्ही बैलांची सुटका केली असून, आरोपी अशोक बावणे आणि ज्ञानेश्वर वरगणे (दोघेही रा. सिंधी रेल्वे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.