रामटेक: भोजापूर येथे शासकीय निधीतून मंजूर धम्मकेंद्र, ग्रंथालय व वाचनालयाचा वाद पोहोचला पोलीस स्टेशन रामटेक मध्ये
Ramtek, Nagpur | Mar 13, 2026 रामटेक जवळील भोजापूर येथे सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मकेंद्र ग्रंथालय व वाचनालय अधिकृतपणे मंजूर झाले परंतु प्रस्तावित जागेवर बांधकाम करण्यास स्थानिक काही जातीवादी लोकांकडून विरोध केला जात असल्याने मागील 6 महिन्यांपासून ते रखडले असल्याचा आरोप बौद्ध समाज बांधव व भीम आर्मी भारत एकता मिशनद्वारे करण्यात आले.याच्या विरोधात 12 मार्चला बिडिओ, तहसीलदार व पोलीस स्टेशन अधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आल्याची माहिती 13 मार्चला प्रसिद्ध पत्रका द्वारे देण्यात आली आहे.