उरण: मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास महागणार
Uran, Raigad | May 24, 2026 मोरा ते भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतुकीच्या तिकीट दरात मंगळवार, 26 मे पासून 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळी हंगामाचे कारण देत ही दरवाढ करण्यात आल्याने नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने या पावसाळी हंगामासाठी नवीन तिकीट दर जाहीर केले आहेत. त्यानुसार, प्रौढांच्या पूर्ण तिकिटाचे दर 80 रुपयांवरून थेट 105 रुपये करण्यात आले आहेत.