उमरेड: जलतरण तलावात बुडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; शहरात हळहळ
Umred, Nagpur | Apr 23, 2026 उमरेड येथील नगरपरिषद संचालित 'स्वर्गीय भाऊसाहेब मुळक जलतरण तलावात' पोहायला गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 23 एप्रिल ला सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. तुषार मधु असे मृत तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तुषार आज जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान, पोहताना अचानक तो पाण्यात बुडाला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी व इतरांनी त्याला तातडीने पाण्याबाहेर काढले.