बदनापूर: अंतरवाली सराटी येथे आमदार नारायण कुचे यांनी मनोज जारंगे पाटील यांच्यासोबत घेतला भेंडी भाकरीचा आस्वाद
Badnapur, Jalna | Jun 19, 2026 आज दिनांक 19 जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज जणांनी पाटील यांच्यासोबत जालनाच्या आंतरवाली सराटी येथे भेंडी भाकरीचा आस्वाद घेतल्याचे पाहायला मिळाले आहे, याप्रसंगी भाजपा आमदार प्रसाद लाड हे सुद्धा उपस्थित होते, यावेळी मनोज जारंगे पाटील यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या व मराठा समाज बांधवांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा त्यांनी केली आहे.