कन्नड: शहरातील शासकीय विश्रामगृहात रिपब्लिकन सेनेची कन्नड तालुका कार्यकारिणी जाहीर
आज दि ६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता माध्यमांना माहिती मिळाली की रिपब्लिकन सेनेच्या कन्नड तालुकाध्यक्षपदी बाबासाहेब शिरसाठ यांची निवड करण्यात आली. ही निवड शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत झाली. पक्षाचे प्रदेश नेते सुनील वाकेकर, चंद्रकांत उपेकर, मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोड, जिल्हाध्यक्ष काकासाहेब गायकवाड उपस्थित होते. उपाध्यक्षपदी राहुल सातदिवे, सचिवपदी विठ्ठल तेलुरे, संघटकपदी सी. बी. पवार यांची निवड झाली. शहराध्यक्षपदी शेख फरान शेख आसिफ, शहर उपाध्यक्ष सूर्यकांत बनकर यांची निवड झाली.