जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यावर भरधाव ट्रकने आठ वर्षीय चिमुकल्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. कावड यात्रेदरम्यान देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, संतप्त जमावाने अपघातग्रस्त ट्रक पेटवून दिला.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews