उरण: उरणमध्ये ओएनजीसी नाल्यातून रसायन मिश्रीत पाणी
Uran, Raigad | Jun 19, 2026 उरण तालुक्यातील केंद्रशासनाच्या ओएनजीसी प्रकल्पाच्या नाल्यामधून अचानक मोठ्या प्रमाणात रसायनमिश्रित पाणी वाहून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या रसायनमिश्रित पाण्यातून पांढरा धूर निघत असून, संपूर्ण परिसरात उग्र रासायनिक दुर्गंधी पसरली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना तीव्र श्वसनाचा त्रास जाणवू लागला असून, काही काळ भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.