उमरेड: संशयास्पद रित्या वावरणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांची कारवाई
Umred, Nagpur | Apr 14, 2026 स्वतःची ओळख लपवून, दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीला पाचगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अटकेतील आरोपीचे नाव अविनाश वानोसा गेडाम वय ५५ वर्ष, राहणार हनुमान वार्ड तालुका पवनी, जिल्हा भंडारा असे सांगण्यात आले आहे.ही कारवाई १३ एप्रिल २०२६ रोजी कळमना परिसरात पेट्रोलिंग दरम्यान पोलीस पथकाला हा इसम संशयास्पद रित्या फिरताना आढळला.पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.