वारजे मधील भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयावर पुणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महानगरपालिका नक्की कारवाई करते का हे पहायला जमली प्रचंड गर्दी
वारजे माळवाडी मधील कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर असलेल्या भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयावर पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक 3 च्या कनिष्ठ अभियंता आशिष पवार यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. या कार्यालयावर खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर तथा विद्यमान नगरसेविका हर्षदा शंतनु भोसले यांच्यासह प्रधानमंत्र नरेंद्र मोदी यांच्या पासून अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे फोटो लावण्यात आलेले होते.
#pune #unauthorizedconstruction #constructiondemolishion #bjpoffice #checkmatetimes
Pune City, Pune | Nov 24, 2026