आसाममध्ये बिबट्याचा धुमाकूळ; तिघांवर हल्ला करून गंभीर जखमी केले, गावात भीतीचे वातावरण!
दिब्रुगड, आसाम : आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यातील लेजाई देवानबारी कैबर्ता गावात बिबट्याने धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन ग्रामस्थ गंभीर जखमी झाले असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या हल्ल्यात कुलमणी दास, फुलेश्वर दास आणि रुपेश्वर दास हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी लेजाई मॉडेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#AssamNews #Dibrugarh #LeopardAttack #WildlifeAlert #BreakingNews
Pune City, Pune | Nov 24, 2026