धुळे: शहर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिरे भवन येथे माजी आमदार शरद पाटील यांची विचार विनिमय सभा पार पडली
Dhule, Dhule | Sep 1, 2024 हिरे भवन येथे रक्तदान चळवळीचे प्रणेते व तसेच सामाजिक कार्यकर्ते व धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी आज धुळे शहर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत विचारविनिमय सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस या कार्यक्रमाला धुळे शहरातील माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्यावर प्रेम करणारे, तसेच त्यांच्या सामाजिक कार्य पाहून धुळे शहरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने विचार विनिमय सभेला उपस्थित होते.