बदनापूर: शहरातील व तालुक्यातील शेकडो मातंग समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले निदर्शने
Badnapur, Jalna | May 15, 2026 आज दिनांक 15 मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर शहरातील तालुक्यातील व जिल्हाभरातील शेकडो मातंग समाज बांधवांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केले आहे,याप्रसंगी त्यांची मागणी होती की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण सरकारने तात्काळ करावे म्हणजेच अ ब क ड करावे जेणेकरून मातंग समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ होईल व समाजाचा विकास होईल त्यानंतर त्यांनी या मागण्यांची निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.