चिखलीतील चिमुकलीवरील भटक्या कुत्र्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
पिंपरी-चिंचवड : चिखली परिसरात लहान मुलीवर भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि. २० ऑगस्ट) आंदोलन करण्यात आले.
मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ दुपारी सुमारे १.२० वाजता हे आंदोलन करण्यात आले. नगरसेवक यश साने, संगीता ताम्हणे आणि विकास साने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उप�
Pune City, Pune | Aug 20, 2026