भोसरीतील इंद्रायणी नगर येथे गॅलेक्सी इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग, !
Video Credit By- Reporter Yunus Khatib
भोसरी : इंद्रायणीनगर येथील गॅलेक्सी इंडस्ट्रीज या पेंट कंपनीला सोमवारी (२४ ऑगस्ट) भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे काम सुरू केले.
घटनेची माहिती देताना अग्निशामक अधिकारी शहाजी कोपणार यांनी सांगितले की, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाच्या पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. पेंट व ज्वलनशील पदार्थांमुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
आगीचे नेमके कारण तसेच झालेल्या नुकसानीची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
#indrayaninagar #galaxyindustries #pimprichinchwad #bhosarimidc #fire
Pune City, Pune | Aug 24, 2026