संभाजीनगर - कचोरीत उंदराच्या लेंड्या; FDA ची धडक कारवाई, भवानी स्वीट मार्ट सील !
‘भवानी स्वीट्स’ वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत दुकान सील केले आहे. एका ग्राहकाने घेतलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या (विष्ठा) आढळल्याने खळबळ उडाली होती. लहान मुलांनी ही कचोरी खाल्ल्यानंतर पालकांनी तात्काळ प्रशासनाकडे तक्रार केली.
तक्रारीवरून एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दुकानावर अचानक धाड टाकली. तपासणीत दुकानात कमालीची अस्वच्छता आढळली आणि हे दुकान कोणत्याही वैध परवान्याशिवाय (FSSAI License) सुरू असल्याचे उघड झाले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल्याप्रकरणी प्रशासनाने दुकान पुढील आदेशापर्यंत तातडीने सील केले आहे. "नियम न पाळणाऱ्या विक्रेत्यांवर अशीच कडक कारवाई केली जाईल," असा इशारा एफडीएने दिला आहे.
#bhavanisweets #foodsafety #chhatrapatisambhajinagar #cleanfood #publichealth
Pune City, Pune | Aug 24, 2026