Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

महाड: खाडीपट्ट्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण

Mahad, Raigad | May 11, 2026
महाड खाडीपट्टयातील 21 गावांसाठी जीवन संजीवनी ठरलेल्या खैरे धरणावरील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून ऐन लग्नसराईसह रखरखत्या उन्हाच्या मे महिनामध्ये पाणीपट्टी धारकांचे पाण्यावाचून हाल झाले असून टँकरद्वारे पाणी विकत मागवावे लागत आहे. गेली पाच-सहा वर्षे ही परिस्थिती जैसे थे असून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे नेहमीचेच बारा वाजल्याचे पाहायला मिळत असून संतप्त झालेल्या नागरिकांचा आंदोलनाचा पावित्रा उचलण्याचा निर्णय झाला आहे. लोकप्रतिनिधींना मात्र याचे काहीही देणे घेणे नसल्याचे काही अंशी पाहायला मिळत आहे.