नागपूर शहर: सायबर फसवणूक व क्रिकेट सट्टेबाजीचे रॅकेट उघडकीस : सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांनी 19 ऑगस्टला दुपारी 5:30 ला दिलेल्या माहितीनुसार ,खामला परिसरातून सायबर फ्रॉड आणि सट्टेबाजी प्रकरणातील दोन मुख्य मास्टरमाइंडना ताब्यात घेतले. गरीब नागरिकांना लालच देऊन त्यांच्या नावावर बनावट बँक खाती उघडले जात होते.ही खाती आणि एटीएम कार्ड्स १५ ते ३० हजार रुपयांना इतर सायबर गुन्हेगारांना विकले जात होते.गोवा येथील एका सक्रीय पॅनेलचा सुराग लागल्याने पोलिसांनी तिथे छापा टाकून आणखी एका आरोपीला अटक केली आहे.