महानगरपालिका निवडणुकीसाठी शहराच्या सर्व झोनमध्ये १५ जानेवारी रोजी सुमारे ५२५ बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर, १४ जानेवारी रोजी निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर पोहोचवण्यासाठी बसेसचा वापर होणार असल्याने, शहरातील सामान्य बस सेवा पूर्णपणे बंद राहील.दुसऱ्या दिवशी, १५ जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी शहरात बस सेवा मर्यादित स्वरूपात आणि केवळ ठराविक मार्गांवरच सुरू राहील.