कामठी: कामठीत खळबळ: ६५ वर्षीय वृद्धाची गळफास लावून आत्महत्या
Kamptee, Nagpur | May 23, 2026 23 मे ला दुपारी चार वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गवळीपुरा परिसरात एका ६५ वर्षीय वृद्धाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव राजू यादव (वय ६५ वर्ष) असून ते गवळीपुरा येथील रहिवासी होते.