कामठी: कामठीत महिलेची धारदार शस्त्राने हत्या; आरोपीचा शोध सुरू
नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ३५ वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला भाग्यश्री विनोद रक्षक (वय ३५) ही आपल्या बहिणीकडे कामठी, गादा येथे राहून खाजगी काम करत होती.