ठाणे: मिरा भाईंदर उत्तन येथे व्यापाऱ्यांकडून स्थानिक मच्छीमारांची फसवणूक, मनसे आक्रमक
Thane, Thane | Dec 3, 2025 मिरा भाईंदर येथील उत्तन येथे स्थानिक मच्छीमारांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून मनसेचे मिरा भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी आज दिनांक 3 डिसेंबर रोजी दुपारी 2च्या सुमारास प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.