उमरेड: पाचगाव पोलिसांची कारवाई: अवैध रेती वाहतुकीवर धाड
Umred, Nagpur | Jun 23, 2026 पाचगाव पोलिसांनी चांपा टोल नाक्यावर सापळा रचून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४५ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ट्रक आणि रेती जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी वाहन चालक पार्थ सुधीर रामटेके (२२, रा. सिरसाळा) आणि ट्रक मालक बिरेंद्र दिनानाथ हटवार (३६, रा. नागपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.