अमित शाहांचं तामिळनाडूत भव्य स्वागत! CM विजय यांनी केलं अभिवादन; दक्षिण विभागीय परिषदेची बैठक
तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील कोवलम येथे ३१व्या दक्षिण विभागीय परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 🚨
बैठकीच्या सुरुवातीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी अमित शाह यांचे स्वागत केले. या बैठकीत दक्षिण भारतातील राज्यांशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
आंतरराज्यीय जलवाटप, पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सहकार्य, औद्योगिक गुंतवणूक, सुरक्षा आणि केंद्र-राज्य समन्वय यांसारख्या विषयांवर बैठकीत विचारविनिमय झाला.
आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तेलंगणा आणि पुद्दुचेरीसह दक्षिण भारतातील प्रमुख राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. 👀
केंद्र आणि राज्यांमधील समन्वय वाढवणे तसेच आंतरराज्यीय प्रश्न संवादातून सोडवणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.
#AmitShah #CMVijay #TamilNadu #Chengalpattu #SouthernZonalCouncil #TamilNaduNews #SouthIndia #IndianPolitics #PoliticalNews #BreakingNews #LatestNews #ViralNews #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Aug 20, 2026