बोगस डॉक्टरचा प्रताप: दुसऱ्या डॉक्टरचा नोंदणी क्रमांक वापरून डॉक्टर तरुणीशी विवाह; ५० लाखांच्या खंडणीसदृश हुंड्यासाठी छळ
लातूर येथील धक्कादायक प्रकार; स्टेथॉस्कोपही वापरता न आल्याने फुटले बोगस डॉक्टरचे पितळ; पीडित डॉक्टर तरुणीची न्यायासाठी धाव
मलकापूर/लातूर (विशेष प्रतिनिधी):
दुसऱ्याच एका डॉक्टरचा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा (MMC) अधिकृत नोंदणी क्रमांक व बोगस ओळखपत्र वापरून एका बी.ए.एम.एस. (BAMS) डॉक्टर तरुणीशी विवाह करून तिची फसवणूक केल्याचा, तसेच लग्नानंतर तिचा शारीरिक व मानसिक छळ करून ५० लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्टेथॉस्कोपचाही वापर करता न येणे आणि वैद्यकीय ज्ञानाचा अभाव यावरून संशय आल्यानंतर या बोगस डॉक्टरचे बिंग फुटले. याप्रकरणी पीडित तरुणीने संबंधित बोगस डॉक्टर व त्याच्या कुटुंबीयांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
खोट्या माहितीच्या आधारे जुळवला विवाह
मलकापूर (जि. बुलढाणा) येथील रहिवासी असलेल्या डॉ. प्रिया अनिल सोनुने (विवाहानंतर डॉ. प्रिया योगेश शेळके) या बी.ए.एम.एस. डॉक्टर आहेत. त्यांच्या वडिलांचे २०११ मध्ये अपघाती निधन झाल्यानंतर आई व भावाच्या साथीने त्यांनी जिद्दीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, 'कुंभार समाज मॅट्रिमोनी' व्हॉट्सअॅप ग्रुपवर लातूर येथील योगेश रमेश शेळके याचा बायोडाटा त्यांच्या कुटुंबीयांना मिळाला. बायोडाटात योगेशने रशियातील बिश्केक (किरगिझस्तान) येथून एम.बी.बी.एस. पूर्ण केल्याचे, भारतातील 'FMGE' परीक्षा उत्तीर्ण असल्याचे, तसेच तो लातूरच्या फुलाबाई बनसोडे हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत असून रशियातून 'एमडी डर्मेटॉलॉजी' करत असल्याचे नमूद केले होते. त्याला कोणतेही व्यसन नसल्याचा दावाही करण्यात आला होता.
त्याच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र (क्रमांक: २०२४०१०४९७) दाखवले. नोव्हेंबर २०२५ मध्ये 'एमएमसी'च्या वेबसाईटवर पडताळणी केली असता त्या क्रमांकावर योगेश शेळके यांचेच नाव दिसत असल्याने कुटुंबीयांचा विश्वास बसला आणि २७ नोव्हेंबर २०२५ रोजी लातूर येथे दोघांचा विवाह पार पडला.
read more comment...
Pune City, Pune | Aug 20, 2026