🚔 अपहरित ४ महिन्यांचे बाळाची अवघ्या १० तासांत ठाणे पोलिसांकडून सुखरूप सुटका ! 👶❤️
चितळसर पोलीस ठाणे येथे ४ महिन्यांच्या बाळाच्या अपहरणाची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला.
मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपास पथके रवाना करण्यात आली. गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवून अवघ्या १० तासांत अपहरित बाळाचा शोध घेतला.
बाळाला सुखरूपपणे त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. 👶❤️
ठाणे शहर पोलीस — नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर! 🚔 #ThanePolice #ChitalsarPolice #ChildSafety #PoliceAction #SafeChildhood
Thane, Maharashtra | Nov 13, 2026