नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ - ३, पनवेल तर्फे "उडान... नवी आशा-नवी दिशा" हा अत्यंत महत्त्वाचा जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला!
किशोरवयीन मुला-मुलींमध्ये वाढत्या डिजिटल वापराच्या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी, सायबर सुरक्षा, वैयक्तिक माहिती आणि फोटो शेअर करताना घ्यावयाची सावधानी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मुलींना स्वसंरक्षणाचे धडे आणि कराटेचे प्रात्यक्षिक्स दाखवून आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमास माननीय राज्यमंत्री श्रीमती मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्यासह नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंदजी भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपकजी साकोरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रमोदजी शेवाळे, पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, डॉ. प्रीती पांडे , मोहिनी पाटील आणि चैत्र फाऊंडेशन, पुणे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. सुरक्षित राहा, सतर्क राहा!
.
.
#navimumbaipolice #udanprogram #panvel #cybersafety #ᴡᴏᴍᴇɴᴇᴍᴘᴏᴡᴇʀᴍᴇɴᴛ
45 views | Thane, Maharashtra | Nov 8, 2026