ठाणे - जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन दिनांक ४ डिसेंबर २०२४ व १० डिसेंबर २०२४ रोजी साजरा होणार.
1.5k views | Thane, Maharashtra | Dec 2, 2024 ठाणे - जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी साजरा करण्यात येत असून १ ते १९ वयोगटातील सर्व मुला मुलींना जंतनाशक गोळी सर्व अंगणवाडी, खाजगी, शासकीय शाळा, महानगर पालिकेच्या सर्व शाळा, आश्रम शाळा, आर्मी स्कूल, खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा, नवोदय विद्यालय, मिशनरी स्कूल, सुधारगृह, सर्व विद्यालय, महाविद्यालय सर्व ठिकाणी देण्यात येणार आहे. जी मुले दिनांक ४ तारखेला जंतनाशक मोहिमे दिवशी गैरहजर राहतील त्यांना दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी मोप अप दिवशी जंतनाशक गोळ्या खाऊ दिल्या जाणार आहेत.