अंबरनाथ: अंबरनाथ एमआयडीसी येथे लागलेली आग सकाळी साडेपाचच्या सुमारास विझविली
काल रात्री उशिरा अंबरनाथ एमआयडीसी येथील रसिनो कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या आगीमुळे जवळच्या तीन कंपनीचे देखील नुकसान झालं असून या आगीचा झळ कंपनीच्या बाहेरच्या परिसरात देखील बसला आहे. ही आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास विझविली आहे. या आगीमध्ये प्लांट ऑपरेटर अनिल यादव गंभीर जखमी झाले आहेत. काल रात्री कंपनीत अचानक स्पोट झाला आणि त्यानंतर केमिकलच्या कंटेनरला आग लागून स्पोट झाला. त्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरली.