अंबरनाथ: अंबरनाथ एमआयडीसी येथे लागली आग
अंबरनाथ एमआयडीसी मधील एका रासायनिक कंपनीला आग लागल्याची घटना आज दिनांक २४ नोव्हेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास घडली आहे. या कंपनीत अनेक मजूर अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच या आगीने रौद्र रूप धारण केले असून या आगीचा झळ आजूबाजूच्या गोदामाला देखील बसला असल्याच सांगितल जात आहे.